'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्मिताचा हा राजेशाही थाट चाहत्यांना भुरळ पाडत आहे. स्मिताने नुकताच एक फोटोशूट केलं आहे. मात्र हे फोटोशूट एका दागिन्यांच्या जाहिरातीसाठी आहे. पिवळ्या रंगाची पेशवाई साडी आणि त्यावर मरून रंगाची शॉल घेतलेली स्मिता एखादी राजकुमारी दिसत आहे. स्मिताच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत आहे. या लुकमध्ये स्मिता अगदी उठून दिसत आहे. स्मिताला बिग बॉस मराठीमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. शिवाय स्मिताचं 'पप्पी डे पप्पी डे पारोला' हे गाणंसुद्धा खुपचं हिट झालं होतं. त्यांनतर स्मिता झी मराठीवरील 'काय घडलं त्या रात्री?' या रहस्यमयी मालिकेत झळकली होती.