मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. नुकतच तिनं घागरा चोलीमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत संस्कृतीनं म्हटलं आहे की,…धागे तोड़ लाओ चांदनी से नूर के.. संस्कृतिच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. एका चाहत्यांने म्हटलं आहे की, घूंघट ही बनालो रोशनी से नूर के..यासोबतच काहींनी हार्टची इमोजी देखील पोस्ट केली आहे. या फोटोत संस्कृतीने हिरव्या रंगाचा घागरा घातला आहे. तिचा हा ग्लॅम अंदाज चाहत्यांना खूपच आवडलेला आहे. तिच्या या लुकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.