मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईने नुकतेच स्टनिंक फोटोशुट केले आहे. सईच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. तिच्या या लुकवर Beautiful.., Stunning अशा कमेंट येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची परिक्षक असलेल्या सईने याच्या एका भागासाठी हा स्टनिंग लुक केला आहे. सई मुळची सांगलीची आहे मात्र मुंबईत येऊन तिनं अभिनयाच्या जिवावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सई नेहमीच तिच्या फोटोशुटमुळे चर्चेत असते. सईने मराठीसोबत बॉलिवूडमध्ये देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे. तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलूंमुळे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. सईने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.