मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड अँड बिनधास्त लुकसाठी ओळखली जाते. सईने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सई ताम्हणकर लाल रंगाच्या साडीत फारच ग्लॅमरस दिसत आहे. लाल रंगाची साडी, कपाळावर लाल रंगाची नाजूक टिकली आणि डोळ्यात काजळ घालून सई सर्वानांच वेड लावत आहे. सई ताम्हणकरने हे फोटो शेअर करत एक खास कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे. सईने या फोटोंना कॅप्शन देत म्हटलं आहे, 'माय लव्ह अफेयर विथ रेड'. सई ताम्हणकर नुकतंच आपल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली होती. यामध्ये तिने आपल्या मिस्ट्री बॉयचा फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शन दिलं होतं. हा मिस्ट्री बॉय इतर कोणी नसून निर्माता अनिश जोग आहे.सध्या हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.