'सैराट' फेम आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू नेहमीच आपल्या लूकने चाहत्यांना झिंगाट करत असते. नुकताच रिंकूने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिचा लूक खूपच स्टनिंग दिसत आहे. रिंकूच हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून भल्याभल्यांना विश्वास ठेवणं कठीण होतं. सैराटमधील ग्रामीण आर्ची ते अशी ग्लॅमरस रिंकू अनेकांना भुरळ पाडत आहे. रिंकूने अलीकडेच मोठ्या पप्रमाणात आपलं वजन कमी केलं आहे. सध्या रिंकू खूपच फिट दिसत आहे. रिंकू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. ती सतत चाहत्यांसाठी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. रिंकूच्या या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांनाचा घायाळ केलं आहे. युजर्स रिंकूच्या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.