मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही मालिका क्षेत्रातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली.
2/ 11
काही दिवसांपूर्वी अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम ह्यांनी लग्नगाठ बांधली.
3/ 11
अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी पाटील हिने देखील आपल्या आयुष्यातील खऱ्या जोडीदाराची निवड केलेली आहे.
4/ 11
रश्मी पाटील ही मराठी मालिका अभिनेत्री तसेच मॉडेल आहे. झी मराठीवरील कारभारी लयभरी या मालिकेत तिने शोना मॅडमची भूमिका साकारली होती.
5/ 11
21 एप्रिल 2023 रोजी पुण्यातील महाराजा रेस्टोरंट मध्ये रश्मी पाटीलने अक्षय सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला होता.
6/ 11
त्यानंतर आता 21 मे रोजी हे दोघेही विवाहबद्ध अडकले आहेत.
7/ 11
रश्मीने तिच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
8/ 11
यापूर्वी रश्मीने मेहेंदी सोहळा साजरा केला त्यानंतर हळदीचा सोहळा पार पडला.
9/ 11
रश्मीबद्दल सांगायचं झालं तर ती मूळची सांगलीची असून वाडिया कॉलेजमधून तीने आर्ट्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. यासोबतच ती एक इंटेरिअर डिझायनर देखील आहे.
10/ 11
रश्मीला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. कथ्थक, साल्सा, बेलीडान्स, भरतनाट्यम, लॅटिन अशा विविध फॉर्म मधून नृत्याचे धडे गिरवले आहेत.
11/ 11
रश्मी पाटील आणि अक्षयच्या या नवीन प्रवासासाठी चाहते त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. (फोटो साभार- रश्मी पाटील इन्स्टाग्राम)