दिवाळीनिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
|
1/ 5
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत. गोल्डन रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाची ज्वेलरी यामुळे प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
2/ 5
कोरोनामुळे दिवाळी थोडी शांततेमध्ये साजरी होणार असली तर सर्वांच्या मनात उत्साह आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंना ‘दिवाळी साजरी करुया. पण घरी बसून’ असं कॅप्शन दिलं आहे.
3/ 5
प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी हजारोंमध्ये लाईक्स आणि कॉमेंट्स केल्या आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते अनेक फोटोही शेअर करत असते.
4/ 5
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सध्या प्राजक्ता सूत्रसंचालन करत आहे. डान्स असो, अभिनय असो किंवा सूत्रसंचालन प्राजक्ता सगळ्याच क्षेत्रात जीव ओतून काम करते.
5/ 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी फिटनेसबद्दलही तितकीच जागृत आहे. ती स्वत: फिट राहतेच आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी छान टिप्सही शेअर करत असते.