Prajakta Mali : महाराष्ट्राच्या लाडक्या प्राजक्ता माळीचं 'हे' आहे आवडतं वाक्य; वाचून तुम्हीही म्हणाल वा दादा वा!
रानबाजार सारख्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं यावेळी तिचे कमाल फोटो शेअर केलेत. सोबतचं तिनं तिचं आवडतं वाक्यही शेअर केलं आहे.
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अर्थात प्राजक्ता माळी. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुन्हा एकदा सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसत आहे.
2/ 8
प्राजक्तानं आजवर तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली. तिच्या विचारांमुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळेही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
3/ 8
प्राजक्ता अभिनेत्रीबरोबर उत्तम भरतनाट्यम नृत्यांगणा आहे. त्याचप्रमाणे तिला वाचनाचीही आवड आहे.
4/ 8
प्राजक्ताचं वाचनही दांडगं असून लेखनातही तिला काम करायचं आहे. अनेक पुस्तकांचा सध्या तिचा अभ्यास सुरू आहे.
5/ 8
स्त्रीनं स्वत:च्या पायावर उभं राहावं. तिनं तिला जे आवडतं ते करावं. व्यक्त व्हावं अशा स्पष्ट मताची प्राजक्ता आहे.
6/ 8
'ती कोण होती हे तिला आठवलं आणि खेळ बदलला', हे वाक्य प्राजक्ताचं आवडतं वाक्य आहे. माझं ऑल टाइम आवडतं वाक्य असं म्हणत स्वत: प्राजक्तानं हे वाक्य शेअर केलं आहे.
7/ 8
या पोस्टवरील ब्लॅक आऊटफिटमधील प्राजक्ताचे फोटो पाहून चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे.
8/ 8
नेहमीप्रमाणेच प्राजक्ता कमालीची कॉन्फिडन्ट दिसत आहे.