लागिरं झालं जी फेम जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे आपल्या हॉट फोटोंनी नेहमीच चर्चेत असते. लागिरं झालं जी या मालिकेतील 'जयडी' या पात्रामुळे ती घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत आधी हे पात्र किरण ढानेनं साकारलं होतं मात्र काही कारणास्तव तिने ही मालिका सोडली आणि त्या जागी पूर्वाची वर्णी लागली होती. या मालिकेत पूर्वा नेहमीच पारंपरिक ड्रेस आणि साडीमध्ये दिसत होती. मात्र आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये पूर्वा खूपच बोल्ड आणि हॉट आहे. ती नेहमीच वेस्टर्न अंदाजात दिसून येते. तिच्या फोटोंना चाहते खूपच पसंत देखील करतात लागिरं झालं जीनंतर पूर्वा एका डान्स शोमध्ये सुद्धा दिसून आली होती. चला हवा येऊ द्यामध्ये सुद्धा पूर्वा एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पूर्वा एक स्टाईलिश आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.