अभिनेत्री पूजा सावंत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. पूजाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला लंडनमधील एक फोटो शेअर केला आहे. सोबतच या फोटोला कॅप्शन देत पूजाने लिहलंय, 'एक पाऊल नव्या साहसाच्या दिशेने' अभिनेत्रींच्या या पोस्टवर युजर्स भरभरून कमेंट्स करत आहेत. वास्तविक पूजा लंडनमध्ये आपल्या आगामी 'माय डॅडस वेडिंग' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेते अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव अशी तगडी स्टारकास्ट आहे. नुकतंच अजिंक्य देव यांनी आपल्या टीमसोबतचा एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती.