मराठमोळी अभिनेत्री नयना मुकेचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नयना मुके आपल्या खाजगी आयुष्यात खूपच हॉट आणि बोल्ड आहे. सतत तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा मिळत असतात. नयनाने येरे येरे पावसा, अनवट यांसारख्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेत तिनं 'लक्ष्मी' मातेची भूमिका साकारली होती. तसंच लोकप्रिय मालिका 'देवयानी'मध्येसुद्धा नयनाने महत्वाची भूमिका साकारली होती. नयनाला 'फायनल डिसीजन' या नाटकातील अभिनयासाठी 'दादासाहेब फाळके' पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला आहे. नयनाने नुकताच अभिनेता विनायक भोकरे सोबत विवाह केला आहे.