मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा साखरपुडा 24 डिसेंबर 2021 मध्ये मोठ्या थाटात पार पडला आहे. या क्यूट कपलचे काही लव्हली एनसाईड फोटो प्रतिकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
|
1/ 9

2/ 9
प्रतीक शाहने ऋतासोबत काही रोमॅंटिक फोटो त्याच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
3/ 9
साखरपुड्याचे हे काही इनसाई़ड फोटो आहेत.या फोटोत दोघांचाही रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहेत.
4/ 9
यंदाच्या वर्षात हे क्यूट कपल लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे.
5/ 9
प्रतीक आणि ऋता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.
6/ 9
प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.
7/ 9
'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे.
8/ 9
ऋता दुर्गुळेनं काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर तिनं थाटात साखरपुडा केला. आता चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.
9/ 9
ऋता दुर्गुळे सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दीपाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांना ऋताची ही भूमिका खूप आवडत आहेत. (फोटो साभार प्रतिक शाह - इन्स्टा पेज)