छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री धनश्री कडगावकर (Dhanashri Kadgaonkar) काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. तर आता तिने आपल्या मुलाचं बारसं करत त्याला साजेसं नावही दिलं आहे. पाहा सोहळ्याचे सुंदर फोटो.
2/ 9
धनश्रीने जानेवारी महिन्यात तिच्या मुलाला जन्म दिला होता. पण त्याचं नाव आणि चेहरा मात्र तिने दाखवला नव्हता. पण आता तिने त्याचं नाव जाहीर करत फोटोही पोस्ट केले आहेत.
3/ 9
धनश्रीने तिच्या मुलाचं नाव कबीर असं ठेवलं आहे.
4/ 9
सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने याची माहिती दिली.
5/ 9
झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील तिची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती.
6/ 9
त्यातील वहिनीसाहेब या भूमिकेने तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती.
7/ 9
धनश्रीने तिचं सुंदर मॅटर्निटी शुटही केलं होतं.
8/ 9
पांढऱ्या गाउनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
9/ 9
सध्या धनश्री छोट्या पडद्यापासून दूर आहे. तर घरीच मुलासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.