'आम्ही दोघ राजा राणी' फेम अभिनेत्री दीप्ती लेलेचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहते. दीप्तीने वेस्टर्न लुकमध्ये एक खास फोटोशूट केला आहे. यामध्ये दीप्ती एकदम हॉट आणि बोल्ड दिसत आहे. फोटो पाहून चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत. दीप्तीच्या फोटोवर कमेंट करत एका चाहत्यानं म्हटलं आहे, 'तू हॉलिवूड अभिनेत्री अलेक्झांड्रिया डॅडारिओ सारखी दिसत आहेस'. दीप्तीचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत. दीप्तीने स्टार प्रवाह वरील 'लगोरी' या मालिकेतून अभिनय सृष्टीत पदार्पण केल होतं. त्यात तिनं 'ऋतुजा' ही भूमिका साकारली होती. ही एक चार मैत्रीणींवर आधारलेली कथा होती. त्यानंतर दीप्तीने 'माझिया माहेरा' या मालिकेमध्ये सुद्धा काम केलं आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती, 'आम्ही दोघं राजा राणी' या मालिकेमुळे यामध्ये दीप्तीने 'मधुरा लेले' हे पात्र साकारलं होतं. मधुराच्या रुपात दीप्ती घराघरात पोहोचली होती. आम्ही दोघं राजा राणी मध्ये मधुरा आणि पार्थची जोडी चाहत्यांना खुपचं पसंत पडली होती. यामध्ये मंदार कुलकर्णीने 'पार्थ' ची भूमिका साकारली होती. दीप्ती मराठी मालिकांमधील एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.