झी मराठीवरील ( Zee Maratahi) मला सासू हवी ( Mala Sasu Havi) फेम अभिनेत्री दीप्ती देवी ( Deepti Devi) हिनं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. तिच्या फोटोंची सध्या चर्चा रंगली असून साऊथ अभिनेत्रींना दीप्ती टक्कर देत असल्याचं म्हटलं जात आहे.
|
1/ 9
कोण म्हणतं केवळ साऊथ अभिनेत्रीच त्यांच्या सौंदर्यानं घायाळ करतात. मराठी अभिनेत्रीही साऊथ अभिनेत्रींना काटेकी टक्कर देताना दिसतात.
2/ 9
अभिनय, हेस्टिंग आणि टेलिव्हिजनवर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दीप्ती देवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत तिचं नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.
3/ 9
यावेळी दीप्तीनं तिचं साऊथ इंडियन स्टाइल फोटोशूट शेअर केलं आहे. तिच्या या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं असून अनेक प्रतिक्रिया फोटोवर पाहायला मिळत आहेत.
4/ 9
निळी पारंपरिक साऊथ इंडियन साडी विथ रेड डिझायनर ब्लाऊजमध्ये दीप्तीचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
5/ 9
त्याचप्रमाणे केसांच्या अंबाड्यात पांढऱ्या खुलांचा फुललेला गजरा आणि कपाळ्यावरच्या लाल टिकलीनं दीप्तीच्या लुकला चार चांद लावले आहेत.
6/ 9
गोल्डन विथ ब्लू डिझाइन ज्वेलरीनं दीप्तीनं तिचा लुक पूर्ण केला आहे.
7/ 9
दीप्तीनं तिच्या मनमोहक लुकसह एकाहून एक सुंदर आणि प्रेमात पाडणाऱ्या पोझेस देत फोटोशूट केलं आहे.
8/ 9
'आरसपाणी सौंदर्य' अशी सुंदर कमेंट दीप्तीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यानं केली आहे.
9/ 9
दीप्तीच्या साडीतल्या या कमाल फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.