मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या बोल्ड अवतारामुळे फारच चर्चेत आहे. पाहा तिचे हटके फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम) भाग्यश्रीने मराठी सोबतच हिंदीतही अभिनय केला आहे. काही हिंदी मालिकांमध्ये ती झळकली होती. अनेक मराठी चित्रपटांतही ती झळकली होती. श्री कामदेव प्रसन्न, विठ्ठल या चित्रपटांत ती दिसली होती. लवकरच भाग्यश्री एका बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. अभिनेता प्रतिक गांधीचा चित्रपट रावन लीलामध्ये ती झळकणार आहे. तिच्या बोल्ड अंदाजामुळे भाग्यश्री कायमच चर्चेत राहते. तिचे बोल्ड लुक तिच्या चाहत्यांनाही फारच आवडतात. सोशल मीडियावर भाग्यश्रीची मोठी फॅनफॉलोइंग आहे.