अपूर्वा नेमळेकरने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेआधी अनेक सीरिअल आणि सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण तिला खरी ओळख 'शेवंता'च्या भूमिकेने दिली. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने विशेष मेहनत घेतली होती. तिला वजन वाढवावं लागलं होतं. तसंच शेवंताच्या भूमिकेसाठी अपेक्षित असलेला ठसका तिला आत्मसात करावा लागला होता. अपूर्वा आता पम्मीच्या भूमिकेत कोणत्या रुपात दिसणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.