मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच आपल्या खास अंदाजाने चर्चेत असते. नुकताच स्पृहाने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहेत. फोटोमध्ये स्पृहाच्या चेहऱ्यावर विविध भाव दिसत आहेत. ते पाहून चाहते घायाळ होतं आहेत. स्पृहाच्या निखळ हास्यावर तर चाहते फिदा आहेत. स्पृहा सध्या 'सूर नवा ध्यास नवा' या मराठी सिंगिंग शोची होस्ट आहे. या शोमध्ये गायक अवधूत गुप्ते आणि महेश काळे परीक्षकाच्या भूमिकेत आहते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने , महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे सूर नवा ध्यास नवा शोचं शुटींग सध्या गोव्यामध्ये सुरु आहे. स्पृहा यामध्ये नेहमीच अगदी उत्साही अंदाजात दिसून येते. तसेच स्पृहा यामध्ये विविध वेशभूषेत सुद्धा दिसून येते. स्पृहा मराठीतील एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. स्पृहाने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचंबरोबर स्पृहा विविध कार्यक्रम होस्ट सुद्धा करताना दिसून येते. स्पृहाला अभिनया बरोबरच कवितांची आवड आहे. होस्ट, अभिनेत्री सोबतचं ती एक कवयित्री सुद्धा आहे. स्पृहाच्या कवितांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दाद मिळत असते.