मराठमोळी अप्सरा अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. आज ही अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या काही तास आधीच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सोनाली कुलकर्णी पती कुणालसोबत रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर सोनालीने कुणालला लीप लॉक करत फोटो शेअर केला आहे. सध्या सोनाली यूएसमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. नुकतंच याठिकाणी अभिनेत्रीने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. सोनाली सतत सोशल मीडियावर आपल्या व्हेकेशनचे फोटो शेअर करत आहे. मात्र या सर्व फोटोंमध्ये ती एकटीच दिसून येत होती. त्यामुळे तू पतीसोबत फोटो का शेअर करत नाहीस? असा प्रश्न चाहत्यांनी केला होता. सोनालीने उत्तर देत 'लवकरच' असं म्हटलं होतं.त्यांनतर काही तासांतच अभिनेत्रीने कुणालसोबतचे आपले फोटो शेअर केले आहेत.