मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या हटके अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेते. अमृता सध्या रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. नुकताच अभिनेत्रीने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. त्यामध्ये तिच्या बिनधास्त अदा पाहायला मिळत आहेत. आणि हे फोटो पाहून तुम्हालाही या पोझ ट्राय करण्याची इच्छा होईल. अमृता खानविलकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक बोल्ड, बिनधास्त आणि स्टाईलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या लॉकडाऊनमुळे अमृतासुद्धा घरीच आहे. हा पूर्ण मोकळा वेळ ती आपल्या फिटनेससाठी देत आहे. सध्या सोशल मीडियावर अमृताचे योगा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत. अमृता आपल्या या मेहनतिने सगळ्यांना फिटनेस गोल देताना दिसत आहे. अमृता सुंदर तर आहेच त्याचबरोबर ती खुपचं फिटसुद्धा आहे.