मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सतत आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. नुकताच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती चकाकी असणाऱ्या ब्ल्यू वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे. या ड्रेसमध्ये अमृता खुपचं बोल्ड एंड ब्युटीफुल दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी आणि कलाकार मित्रांनी कमेंट्स आणि लाईक्सची रांग लावली आहे. अमृताच्या या फोटोवर चाहत्याने कमेंट करत 'माझं पहिलं प्रेम' असं म्हटलं आहे. अमृताच्या या फोटोंवर प्रसाद ओक, सिद्धार्थ मेनन, मंजिरी ओक अशा अनेक कलाकरांनी कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या अमृताच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची भरभरून दाद मिळते.