'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर होय. अक्षया नेहमीच आपल्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. आजसुद्धा असंच काहीसं झालं आहे. नुकतंच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती चॉकलेटी रंगाच्या जरीच्या साडीत दिसून येत आहे. अक्षया आपण या सुंदर शालूच्या प्रेमात असल्याचं सांगत आहे. विशेष म्हणजे ही साडी तिला भेट म्हणून मिळाली आहे. अक्षयाची मोठ्या बहिणीच्या सासूबाईंनी तिला हा शालू भेट केला आहे. या अभिनेत्रीला साड्यांची प्रचंड आवड आहे. ती सतत विविध साड्यांमध्ये दिसून येते. वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशनल प्रत्येक लुकमध्ये अक्षया चाहत्यांचं मन जिंकते.