PHOTOS: 'जेव्हा दोन तुटलेली मनं एकत्र आली...'; अभिज्ञा भावेने पतीला दिल्या प्रेमळ शुभेच्छा
मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा अभिनेत्री अभिज्ञा भावेने (Abhidnya Bhave) आपल्या पतीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिने तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. पाहा अभिज्ञा आणि मेहूलचे खास फोटो.
|
1/ 11
मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा अभिनेत्री अभिज्ञा भावेने (Abhidnya Bhave) आपल्या पतीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिने तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. पाहा अभिज्ञा आणि मेहूलचे खास फोटो.
2/ 11
अभिज्ञाने मेहूल पै याच्याशी काही महिन्यांपूर्वी विवाह केला होता.
3/ 11
अभिज्ञाने लग्नापूर्वी मेहूल सोबतची रिलेशनशिप ओपन केली नव्हती. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का होता.
4/ 11
जवळच्या नातेवाईंकासोबत साखरपुडा करून दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
5/ 11
मेहूलच्या वाढदिवसानिमित्त अभिज्ञाने पतीविषयी प्रेम व्यक्त करत लिहीलं आहे, 'मी दोन तुटलेल्या माणसांना एमेकांसोबत आनंद शोधताना पाहिलं आहे, ...' यासोबतच तिने मोठी पोस्ट लिहीली आहे.
6/ 11
अभिज्ञा आणि मेहूल यांनी मुंबईत वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच 6 जानेवारी 2021 ला धुमधडाक्यात लग्न केलं होतं. तर लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक लोत उपस्थित होते.
7/ 11
रिलेशनशिप बाबत सांगतातना अभिज्ञाने सांगितलं होतं की ते दोघेही लग्नापूर्वी जवळपास 15 वर्षांपासून मित्र होते. व त्यानंतर ते प्रेमात पडले. दरम्यान अभिज्ञाचं हे दुसरं लग्न आहे. तीने यापूर्वी 2014 मध्ये लग्न केलं होतं पण त्यावंतर ती विभक्त झाली.
8/ 11
अभिज्ञाने खुलता कळी खुलेना या मालिकेतून चांगली प्रसिद्धी मिळवली होती.
9/ 11
अभिज्ञा आणि मेहूल ने अगदी सुंदर आणि लक्षात राहण्याजोगा विवाहसोहळा केला होता. त्यांच्या आउटफिट्सची विशेष चर्चा रंगली होती.
10/ 11
मेहूल हा अभिनय क्षेत्रात नसून तो एक उद्योजक आहे.
11/ 11
अभिज्ञाने मराठमोळ्या रितीने विवाह केला होता. मेहूलचा आज वाढदिवस असल्याने त्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.