मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेला ओळखलं जातं. सुबोधने अनेक दमदार भूमिका साकारत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. सुबोध भावे सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच अभिनेत्याने आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो आपल्या टीमसोबत दिसून येत आहे. अभिनेत्याने फोटोला कॅप्शन देत लिहिलंय, ''आणि नवी सुरुवात... पुण्याच्या पवित्र अशा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मुहूर्त करुन नवीन कामाची सुरुवात'. सुबोध सध्या पुण्यामध्ये आपल्या नव्या प्रोजेक्टसचं शूटिंग करत आहे. यावेळी त्याची पत्नी आणि निर्माती मंजिरी भावेसुद्धा उपस्थित असलेली दिसून येत आहे. सुबोध भावेच्या या पोस्टवर त्याच्या कलाकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये सायली संजीव, हार्दिक जोशीपासून ते सुयश टिळकपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे.