'आठवांचा गाव', सुबोध भावेने शेअर केला गावाकडील अप्रतिम PHOTO
Subodh Bhave: मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेला ओळखलं जातं. सुबोधने अनेक दमदार भूमिका साकारत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
|
1/ 8
मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेला ओळखलं जातं. सुबोधने अनेक दमदार भूमिका साकारत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
2/ 8
मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून विविध भूमिका साकारून सुबोध मराठीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.
3/ 8
सुबोध सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असतो. तो सतत फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असतो.
4/ 8
अभिनेता सतत निसर्गातील अद्भुत गोष्टी शेअर करत असतो. आजही अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
5/ 8
हा फोटो भोर या गावातील आहे. फोटोमध्ये सुंदर नदी त्याकडेला एक छोटंसं मंदिर आणि नारळाची झाडे दिसून येत आहेत.
6/ 8
या फोटोला कॅप्शन देत सुबोधने 'आठवांचा गाव'असं म्हटलं आहे. काही चाहत्यांनी यावर कमेंट करत तुझं गाव आहे का असं विचारलं आहे, तर त्यावर उत्तर देत सुबोधने नाही असं उत्तर दिलं आहे.
7/ 8
सुबोध नेहमीच असे वेगवेगळे फोटो शेअर करत त्याला लक्षवेधी कॅप्शन देत असतो.
8/ 8
सुबोध सध्या आपल्या नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.