सेल्फी बाबतीत कलाकारांचा तर विषयच वेगळा. आपला आवडता कलाकार जिथे भेटेल तिथं ते सेल्फी काढत सुटतात.
2/ 10
असाच एक अनुभव अभिनेत्री पुष्कर श्रोत्रीला आला होता. पुष्कर कामानिमित्तानं एक्सप्रेस वेव वरून प्रवास करत होता.
3/ 10
प्रवासात फ्रेश होण्यासाठी तो एका पब्लिक टॉलेटजवळ थांबला. टॉयलेटला गेला असता पुष्करला टॉयलेटमध्ये एक माणूस भेटला.
4/ 10
टॉयलेटमध्ये भेटलेला तो व्यक्ती पुष्करचा मोठा फॅन होता. पुष्करला पाहून तो जाम खुश झाला.
5/ 10
त्याने पुष्करबरोबर हात मिळवला आणि एका हातानं त्यानं फोन बाहेर काढला.
6/ 10
पुष्कर टॉयलेटला गेला असता तो त्याच्या बाजूला उभा राहून, 'सर प्लिज मला एक सेल्फी द्या', असं म्हणाला.
7/ 10
त्यावेळेस पुष्करला काय करू कळेना. तो त्याला म्हणाला, 'थांबा जरा. माझं होऊ देत. आपण बाहेर जाऊ मग मी तुला सेल्फी देतो'.
8/ 10
पण पुष्करचा तो जबरा फॅन काही ऐकायला तयार नव्हता. 'अहो नको इथेच सेल्फी द्या मला. बाहेर जाईपर्यंत माझी बस जाईल', असं तो पुष्करला म्हणाला.
9/ 10
त्याच्या या वाक्यानंतर काय करावं हे पुष्करलाही सुचलं नाही. त्यावर पुष्कर त्याला म्हणाला, 'अहो तिथे तुमची बस जाईल. पण इथे माझी इज्जत जाईल'.
10/ 10
अखेर त्या फॅनन पुष्करबरोबर त्या पल्बिक टॉयलेटमध्येच सेल्फी घेतला. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये एका एपिसोडला पुष्कर पाहुणा म्हणून आला असत त्यानं हा धमाकेदार किस्सा सर्वांबरोबर शेअर केला.