बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्तने केजीएफ चॅप्टर 2 चं शूटिंग पूर्ण केलं आहे. सिनेमाचं काम सुरू असाताना संजयवर कॅन्सरचे उपचार सुरू होते. पण तरीही संजयने सिनेमाचं काम वेळेत पूर्ण केलं आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी एक ट्वीट करत संजयची स्तुती केली आहे. यात त्यांनी संजयला फायटर म्हटलं आहे.
जुलै 2018 मध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. कॅन्सरचा संपूर्ण अनुभव तिने फोटो आणि पोस्टमधून सोशल मीडियावर सांगितला. न्यूयॉर्कमध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याच वर्षी डिसेंबरमध्ये सोनाली भारतात परतली. पण तिला चेक अप साठी सतत न्यूयॉर्कला जावं लागायचं. सोनाली आणि तिच्या कुटुंबियांनी कणखरपणे कॅन्सरसारख्या आजाराला परतवून लावलं. त्यानंतर काही जाहिरांतींमध्ये ती झळकली.
लिसा रे हे नाव कसूर सिनेमापासून चर्चेत आलं. करिअर बऱ्यापैकी सुरू असताना 2009 मध्ये तिला कॅन्सर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण यामुळे हतबल न होता लिसाने सगळी ट्रीटमेंट घेतली. असं म्हटलं जातं की ती कॅन्सरमधून अजूनही पूर्ण बरी झालेली नाही. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या फोअर मोअर शॉर्ट्स प्लीज या वेब सीरिजमध्ये लिसा अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली होती.
उत्तम दिग्दर्शक अशी अनुराग बासूची ओळख आहे. पण अनुरागलाही 2004 मध्ये ब्लड कॅन्सरचा सामना करावा लागला होता. तो फक्त 2 महिनेच जिवंत राहू शकेल अशी भीती डॉक्टरांना वाटत होती. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तो कॅन्सरमधून पूर्ण बरा झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने दिग्दर्शित केलेला लूडो सिनेमा रीलिज झाला आहे.