मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड लूकमुळे ओळखली जाते. मात्र आज बोल्ड नव्हे तर ट्रॅडिशनल लूकमुळे ती चर्चेत आली आहे. मलायका अरोराने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची साधता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. फोटोंमध्ये मलायका अरोराने लाल रंगाचा एकदम भरदार लेहंगा परिधान केला आहे. या ट्रॅडिशनल लूकमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे. मलायकाने एका फॅशन ब्रँडसाठी हे फोटोशूट केल्याचं दिसत आहे. मलायका फोटोंमध्ये एखाद्या नवख्या नवरीसारखी दिसत आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तीत सतत ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तसेच ती आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.आपला फिटनेस राखण्यासाठी ती सतत एक्सरसाइज करताना दिसून येते. वयाच्या पन्नाशीतही मलायका फारच सुंदर आणि फिट आहे. तिला बॉलिवूडची एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. अनेक तरुणीला तिला स्टाईल आयकॉन म्हणून पाहतात. तर मोठ्या प्रमाणात तरुणी तिचा फॅशन फंडा फॉलो करताना दिसतात.