rjun Kapoor And Malaika Arora: या आठवड्यात मलायका अऱोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर(Arjun Kapoor) यांचे ब्रेकअर झाल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. मात्र या सर्वानंतर अर्जुन कपूरने सोशल मीडियावर मलायकासोबत फोटो शेअर करत अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका म्हणत हम साथ साथ हैचा नारा दिला होता. आता या सगळया नंतर ही हॉट जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)
यानंतर मलायकाने देखील पोस्ट करत म्हटलं होते की, "नाही, हे खरंच आहे का. जर तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी प्रेम मिळत असेल तर या गोष्टीकडे सामान्य दृष्टीकोनातून पाहा. वयाच्या तिशीत नवीन गोष्टींची स्वप्ने पाहणे आणि नवीन गोष्टींची इच्छा बाळगणे याकडे सहज दृष्टीकोनातून पाहा. वयाच्या पन्नाशीत आपल्या जीवनातील उद्देश मिळू शकतो किंवा तुम्ही शोधू शकता. या गोष्टीकडे देखील सामान्य दृष्टीकोनातून पाहा. वयाच्या 25 व्या वर्षी आयुष्य संपत नाही. असे वागणे थांबवा आणि जीवनात तुमच्या विचारसरणीत प्रगल्भता आणा."