Myra Vaikul : मायरा घेतेय भरतनाट्यमचं शिक्षण; थेट फोटो शेअर करत दिलं सरप्राइज
बालकलाकर मायरा वायकुळ पुढील काही वर्षात भरतनाट्यम डान्सर म्हणून नवी ओळख निर्माण करणार असं दिसत आहे. मायरानं भरतनाट्यम नृत्याच्या वेशभूषेतील तिचे सुंदर फोटो शेअर केलेत.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील सर्वांची लाडकी परी म्हणजे मायरा वायकुळचा नवा लुक समोर आला आहे.
2/ 8
मायरा सोशल मीडियावर चांगलीच अँक्टिव्ह असते. तिचे व्लॉग्स पहायला मिळत असतात.
3/ 8
परीनं नुकतेच भरतनाट्यमच्या नृत्याची वेशभूषा करत फोटो शेअर केलेत.
4/ 8
मायरानं मालिका सोडल्यानंतर भरतनाट्यम नृत्याचं शिक्षण सुरू केलं आहे असं दिसत आहे.
5/ 8
परीनं प्रत्येक फोटोमध्ये भरतनाट्यम नृत्यातीत प्रत्येक मुद्रा फार सुंदररित्या दाखवली आहे.
6/ 8
भरतनाट्यम नृत्याची ड्रेस, ज्वेलरी, हेअर स्टाइलमध्ये मायराचा लुक पूर्णपणे बदलला आहे.
7/ 8
मायराच्या युट्यूब चॅनेलवर लवकरचा तिचा भरतनाट्यम नृत्य करतानाचा एक छोटा व्हिडीओ देखील पाहायला मिळणार आहे.
8/ 8
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतही परी रेवती टिचरकडे भरतनाट्यम नृत्य शिकत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता खऱ्या आयुष्यातही परी भरतनाट्यम नृत्याचं शिक्षण घेताना दिसत आहे.