माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा नेहमीच चर्चेत असते. चाहते छोट्याशा परीला भरभरुन प्रमे देत असतात. छोट्याशा परीनं म्हणजेच मायरानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ते फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लहानग्या वयात परीनं तिच्या अभिनयानं आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांच्या मनात घर बनवलं आहे. नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये परीनं गुबाली रंगांतं परकर पोलक घातलं आहे. फोटोंमध्ये परी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिचा निरागसपणा चाहत्यांना आवडला आहे. 'तुम्हाला कुठली पोझ आवडली?', असं म्हणत परीनं तिचे क्यूट फोटो शेअर केलेत. परीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायल होत आहेत. मायराच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दिवसेंदिवस परीचा चाहतावर्ग हा वाढतच चाललेला पहायला मिळत आहे.