Mahesh Babu च्या पत्नीने लग्नापूर्वी 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकाला केलं आहे डेट
अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या चित्रपटांपासून दूर आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहे.
|
1/ 9
हेरा फेरी, कच्चे धागे, पुकार, दिलेर अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या चित्रपटांपासून दूर आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहे.
2/ 9
मराठमोळी नम्रता शिरोडकर साऊथ सुपरस्टार महेशबाबूची पत्नी आहे. ती सतत सोशल मीडियावर पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते.
3/ 9
'पूरब की लैला, पश्चिम का चैला' हा नम्रताचा पहिला चित्रपट होता परंतु हा चित्रपट रिलीजच झाला नाही. त्यानंतर अभिनेत्री 'जब प्यार किसीसे होता है' या चित्रपटातून सलमान खानसोबत झळकली होती.
4/ 9
तसेच नम्रता संजय दत्तसोबत 'वास्तव' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी उपयोगी ठरला.
5/ 9
नम्रता शिरोडकरचं नाव 'वास्तव' चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत जोडलं जात होतं. त्यांच्या अफेयरच्या तुफान चर्चा रंगल्या होत्या. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही.
6/ 9
अभिनेत्री नम्रता शिरोडकरने 1993 मध्ये 'मिस इंडिया' हा 'किताब पटकावला होता. तिचं सौंदर्य अनेकांना घायाळ करत होतं.
7/ 9
अभिनेत्रीने साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत लग्न केलं आहे. या दोघांची पहिली भेट 'वामसी' या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
8/ 9
एकेमकांना 5 वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न गाठ बांधली होती. नम्रता आणि महेशबाबूला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
9/ 9
नम्रता शिरोडकरने फक्त हिंदीच नव्हे तर मराठी,मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.