पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यामध्ये रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाणार असून, 50 टक्केची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचा-यांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंट प्रवेशात प्राधान्य देण्यासंदर्भातील विचार सुरू आहे. शक्य असेल तिथं बंदिस्तऐवजी मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था हॉटेलना करण्याच्या सूचना दिल्या जातील.