'वेदनेशिवाय आयुष्य नाही...'; महालक्ष्मीच्या दुसऱ्या नवऱ्यानं अखेर सांगितली मन की बात, अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर
आपल्या लग्नामुळे सातत्यानं ट्रोल होणाऱ्या अभिनेत्री महालक्ष्मीच्या नवऱ्यानं तिच्या बर्थ डे दिवशी त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्यात. प्रोड्यूसर अभिनेत्रीविषयी काय म्हणाला पाहा.
बॉलिवूडप्रमाणेच साऊथ सिनेसृष्टीतही अनेक कलाकारांची लग्न होत आहेत. पण त्यातील एक लग्न मागील वर्षापासून चांगलंच गाजलंय ते म्हणजे अभिनेत्री महालक्ष्मी प्रोड्यूरस रविंद्र चंद्रशेखरन. नुकताच अभिनेत्रीचा वाढदिवस झाला. यावेळी नवऱ्यानं महालक्ष्मीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं.
2/ 9
अभिनेत्री महालक्ष्मी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. महालक्ष्मीला तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या शरिरयष्टीमुळे चांगलंच ट्रोल करण्यात आलं. महालक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याच्या दिसण्यातमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिनं फक्त पैशांसाठी रविंद्र चंद्रशेखरन बरोबर लग्न केल्याचं म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं.
3/ 9
पण ट्रोलिंगला कोणतंही खतपाणी न घातला महालक्ष्मी तिच्या नवऱ्याबरोबर आयुष्य आनंदानं जगताना दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांचे लेटेस्ट फोटो ती शेअर करत असते.
4/ 9
महालक्ष्मी आणि रविंद्र आपली पर्सनल लाइफ इन्जॉय करत आहेत. अभिनेत्री तिचं नवऱ्यावरील प्रेम नेहमीच व्यक्त करत असते पण यावेळी नवऱ्यानं तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलंय.
5/ 9
रविंद्र चंद्रशेखरनं म्हटलंय, "वेदनाशिवाय आयुष्य नाही...मार्गाशिवाय आयुष्य नाही. ही मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि माझे डोळे उघडले. माझ्या वेडेपणाशी ती आधी सहमत नव्हती पण तिनं दाखवून दिलं की प्रेम माझ्यात बदल घडवू शकतं. मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे".
6/ 9
अभिनेत्री महालक्ष्मीनं देखील नवऱ्याच्या प्रेमावर "लव्ह यू मोर" असं म्हणत प्रेम व्यक्त केलं आहे. अभिनेत्रीच्या या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. या पोस्टला आतापर्यंत 24हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
7/ 9
अभिनेत्री महालक्ष्मीचं रविद्रबरोबर हे दुसरं लग्न आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानं तिनं घटस्फोट घेतला. त्यानंतर तिचे सूत प्रोड्यूसर रविंद्र चंद्रशेखरनंबरोबर जुळले.
8/ 9
रविंद्रबरोबर लग्न झाल्यापासून अभिनेत्री महालक्ष्मी ती खूप आनंदी असल्याचं सांगते. आयुष्यातील सर्वात आनंदाचे दिवस मी जगत असल्याचं तिचं म्हणणं आहे.
9/ 9
दोघेही एकत्र अनेक ठिकाणी फिरत असतात. साऊथच्या प्रसिद्ध मंदिराच्या भेटीचे फोटो ते शेअर करत असतात.