बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. इतकी वर्ष आपल्या अदाकारीने माधुरीने सर्वांनाचं घायाळ केलं आहे. माधुरीने अनेक दमदार भूमिका साकारत आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. माधुरीच्या स्माईलचे आजही लाखो लोक वेडे आहेत. बॉलिवूडमध्ये राज्य करणारी ही अभिनेत्री अस्सल महाराष्ट्रीयन आहे. माधुरी जरी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असली, तरी ती एक मराठमोळी मुलगी आहे.