मालिकेत सोज्वळ भूमिका साकारणारी माधवी खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. अन् तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. परंतु अलिकडेच तिने मनोरंजनसृष्टीत येण्यापूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून ही नक्की माधवीच आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. तिचा हा फोटो पाहून तिच्यात झालेला बदल पाहून अनेकांनी आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. माधवी निमकर अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.