Guess Who : रील नाही हे आहे रिअल आयुष्यातलं लग्न; अभिनेत्रीला ओळखलं का?
मनोरंजन विश्वात सध्या अनेक जण लग्न करत आहेत. अशातच एका अभिनेत्रीचा लग्नातील फोटो समोर आलाय. हा फोटो रील लग्नाचा नाही तर तिच्या रिअल लग्नाचा आहे. ओळखा पाहून फोटोतून नटून थटून लाजणारी नवरी आहे तरी कोण?
सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. नुकतंच कारभारी लय भारी मालिकेतील रश्मी पाटीलनं लग्न केलं. रश्मी नंतर आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर आलेत.
2/ 10
ही अभिनेत्री टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती म्हणजे सायली देवधर.
3/ 10
सायली सध्या स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी मालिकेत करतेय. त्याआधी तिनं लग्न पाहावे करून, लेक माझी लाडकी, जुळून येती रेशीमगाठी सारख्या मालिका आणि सिनेमात काम केलं आहे.
4/ 10
अनेकांना सायलीचं लग्न झालं आहे हे माहिती नाही. सायलीनं 2020साली गौरव बुरसेबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
5/ 10
सायली आणि गौरव यांनी अस्सल मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं होतं.
6/ 10
2019मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतर एक वर्षांनी त्यांनी लग्न केलं.
7/ 10
सायलीच्या लग्नाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
8/ 10
अभिनेत्री सायलीचा नवरा गौरव बुरसे हा देखील कलाकार आहे. गौरव हा प्लेबॅक सिगिंर आणि म्युझिक कम्पोजर आहे.
9/ 10
गौरवचा इजाफत हा कार्यक्रम सध्या सुरू आहे.
10/ 10
ऐन लग्न सराईत सायलीचा लग्नातील बाशिंग बांधलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.