'कुंडली भाग्य' या टीव्ही मालिकेत प्रीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ती अनेक मनोरंजक पोस्ट्स शेअर करत असते. अलीकडेच अशाच काही कारणांमुळे श्रद्धा चर्चेत आली आहे. तिने काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील श्रद्धाची किलर स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे. (Photo Credit- @sarya12/Instagram)