Birthday Special: ...तर हेमा मालिनी यांचं जितेंद्र यांच्याशी झालं असतं लग्न
70- 80 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री ड्रिम गर्ल हेमा मालिनी ( Hema Malini) यांचा आज 72 वा वाढदिवस. त्यांचा विवाह धर्मेंद्र यांच्यासोबत झाला. मात्र एक फोन आला नसता तर कदाचित त्यांचा विवाह हा अभिनेते जितेंद्र यांच्याशी झाला असता. जाणून घेऊया हा किस्सा.


हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर, 1948 रोजी तामिळनाडूच्या अमंकुदीमध्ये झाला. त्यांनी अनेक ब्लॉकब्लस्टर चित्रपट दिले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत त्यांचे स्थान अव्वल आहे. (फोटो सौजन्य- व्हिडीओ ग्रॅब Youtube)


हेमा मालिनी क्लासिकल डान्समध्ये एक्स्पर्ट आहेत. भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी आशा विविध नृत्यप्रकारांचे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. 'सीता और गीता' या चित्रपटापासून हेमा मालिनी यांनी बॉलिवूडमध्ये धमाल उडवून दिली होती. त्यांचा हा डबलरोल असलेला सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपट दिल्याने बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी यांचं मोठं नाव झालं होतं. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम @dreamgirlhemamalini)


'सीता और गीता' चित्रपटापासून हेमा आणि धर्मेंद्र एकत्र आले, त्यांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले, प्रेक्षकांनाच नव्हे तर दिग्दर्शकांनाही ही जोडी आवडायची त्यांनी सोबत अनेक चित्रपट दिले. त्यांचे नाते यातून घट्ट होत गेले. या जोडीचा अजरामर चित्रपट म्हणजे शोले. . (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम @dreamgirlhemamalini)


याच दरम्यान अभिनेते जितेंद्र हे सुद्धा हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते. शिवाय या दोघांच्या लग्नाची दोन्ही कुटुंबांनी बोलणीही केली होती. बोलणी शेवटच्या टप्प्यात असताना एक फोन आला आणि तो फोन होता धर्मेंद्र यांचा. धर्मेंद्र यांना हेमा मालिनींच्या लग्नाची बोलणी झाल्याची बातमी कळाली होती. त्यामुळे त्यांनी हेमामालिनी यांना गडबडीत कुठलाच निर्णय घेऊ नये, असं सांगितलं.. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम @dreamgirlhemamalini)


या नंतर अजून एक फोन आला आणि हा फोन होता जितेंद्र यांची गर्लफ्रेंड एअरहोस्टेस शोभा सिप्पी यांचा. त्यांनीही हेमामालिनीशी चर्चा करून घाईत निर्णय घेऊ नये, असं सांगितलं. याच शोभा यांच्याशी जितेंद्र यांनी नंतर लग्न केलं. या दरम्यान 1978 मध्ये हेमामालिनीच्या वडिलांचं निधन झालं. आणि त्यांना त्या काळात धर्मेंद्र यांनी मोठा धीर दिला. आणि 1979 मध्ये दोघांचा विवाह झाला. (फोटो साभारः इंस्टाग्राम @dreamgirlhemamalini)