हरियाणामधून बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या सोनाली फोगाट या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्याआधी बिग बॉस 11 मध्ये हरियाणाची डान्सर सपना चौधरी हिने सहभाग घेतला होता. त्या सिझनमधे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. या सिझनमध्ये सपना चौधरी (Sapna Chaudhary) आणि अर्शी खान(Arshi Khan) हिच्यामध्ये मोठी भांडंणं पाहायला मिळाली होती.
सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांनी घरात प्रवेश करताच सर्वांना हरयाणवी भाषेत राम राम केलं. त्याच्या घरातील एंट्री आधी दंगल चित्रपटातील ‘धाकड है’ हे गाणं लावण्यात आलं होतं. त्यामुळे घरात कुणीतरी एंट्री करणार याची घरातील सदस्यांना कुणकुण लागली होती. त्यांनी घरात प्रवेश करताच सर्वांना नमस्कार करत सर्वांची ओळख करून घेतली.
सोनाली (Sonali Phogat) यांचा घरात प्रवेश झाल्यानंतर बिग बॉसने त्यांचा सर्वांना परिचय करून दिला. यावेळी बिग बॉसने हरयाणाच्या दबंग लीडर आणि कलाकार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे घरात स्वागत केले. यावेळी सर्व स्पर्धकांनी त्यांचे हसतहसत घरात स्वागत केले. या फोटोत सोनाली फोगाट आपल्या भारतीय अवतारात दिसून येत आहेत.