छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री किश्वर मर्चंट लवकरच आई होणार आहे. तिचं बेबी बम्प शुट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. पाहा तिचे फोटो. किश्वरने सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. व्हाईट बॉडीसूट आणि हॅट अशा लुकमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. किश्वर सध्या तिची प्रेगंन्सी एन्जॉय करताना दिसत आहे. किश्वरने अनेक मालिकांमध्ये आजवर काम केलं आहे. किश्वरने २०१६साली अभिनेता सुयश रायशी विवाह केला होता. किश्वर बिग बॉसमध्येही दिसली होती. सुयश आणि किश्वर दोघेही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात.