कियारा ते आलिया; बॉलिवूडमध्ये आलाय सूर्यास्तावेळी लग्न करण्याचा ट्रेंड, कारण आहे खूपच खास
सिद्धार्थ-कियारा यांनी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून लग्नगाठ बांधली. सूर्यास्तावेळी लग्न करण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतोय. सिद्धार्थ-कियाराआधी कोणी कोणी अशाप्रकारे सूर्यास्तावेळी लग्न केलंय पाहूयात.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अखेर लग्नबंधनात अडकले. मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली.
2/ 12
पण तुम्हाला माहिती आहे का सिड कियाराच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कपल्सनी अशाप्रकारे सूर्यास्तावेळी लग्नगाठ बांधली आहेत.
3/ 12
कियाराआधी कतरिना कैफ-विक्की कौशल, अथिया शेट्टी-केएल राहुल,आलिया-रणवीर, यांनीही अशाच प्रकारे लग्न केलं होतं.
4/ 12
आता चमचमणाऱ्या रात्री ऐवजी मावळणाऱ्या सूर्यासमोर ( सूर्यास्तावेळी) लग्न करण्याची कोणती पद्धती किंवा रिती रिवाज आहे का? तर नाही यामागचं कारण वाचून तुम्हालाही हसू येईल.
5/ 12
संध्याकाळी 4-6च्या वेळेत लग्न करण्याचा सध्या बॉलिवूडमध्ये ट्रेंड सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंदू धर्मानुसार, लग्नासाठी सकाळची वेळी किंवा रात्रीची वेळ शुभ मानली जाते. पण आता मावळत्या सूर्याकिरणांमध्ये लग्न करण्याचा ट्रेंड सुरू झालाय.
6/ 12
मावळत्या सूर्यासमोर म्हणजेच सन सेटवेळी लग्न करण्यामागे कोणती पद्धती किंवा रितीरिवाज नाहीये तर यामागे आहे कॅमेरात क्लिक होणारे फोटो.
7/ 12
सूर्यास्तावेळी चेहऱ्यावर पडणाऱ्या तेजस्वी प्रकाशात सुंदर फोटो क्लिक होतात. त्यामुळेच बॉलिवूड कलाकार संध्याकाळच्या वेळी लग्न करताना दिसत आहेत.
8/ 12
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनीही सूर्यास्तावेळी लग्न केलं. दोघांमध्ये चमकणारा सूर्य अचूक कॅप्चर करण्यात आला.
9/ 12
दीपिका आणि रणवीरच्या लग्नविधी दुपारी 2 वाजता सुरू झाल्या होत्या. 4-5च्या दरम्यान त्यांचा विवाह संपन्न झाला होता.
10/ 12
आलिया आणि रणवीरचं लग्नही 4-5 वाजताच्या दरम्यान झालं होतं.
11/ 12
अभिनेत्री दीया मिर्झानं 2022मध्ये लग्न केलं. दीया आणि वैभव रेखीचं लग्न संध्याकाळी 5-6 वाजताच्यामध्ये झालं होतं.
12/ 12
कतरिना आणि विक्कीनं देखील राजस्थानच्या 200 वर्ष जुन्या किल्ल्यात लग्न केलं होतं. त्यांचं लग्न 3.30-3.45च्या मध्ये झालं होतं.