KGF स्टार यशने खास अंदाजात साजरा केला पत्नीचा वाढदिवस, रोमँटिक फोटो आले समोर
Radhika Pandit Birthday Celebration:KGF स्टार यश आणि त्याची पत्नी साऊथ अभिनेत्री राधिका पंडित ही साऊथ इंडस्ट्रीतील आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
KGF स्टार यश आणि त्याची पत्नी साऊथ अभिनेत्री राधिका पंडित ही साऊथ इंडस्ट्रीतील आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
2/ 8
अभिनेत्रीने नुकतंच आपला 38 वा वाढदिवस साजरा केला. ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो त्यांच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत.
3/ 8
राधिका पंडितचा जन्म 7 मार्च 1984 रोजी बंगळुरूमध्ये झाला होता. तिने लग्नापूर्वी पती यशसोबत अनेक चित्रपटात काम केलं आहे.अभिनेत्रीने तिचा वाढदिवस पती यश आणि दोन्ही मुलांसोबत साजरा केला.
4/ 8
सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये राधिका आपल्या पती आणि मुलांसोबत केक कापताना दिसत या सेलिब्रेशनमध्ये त्याची मुलं खूपच क्यूट दिसत आहेत.
5/ 8
KGF स्टार यश आणि राधिका यांची लव्हस्टोरी फारच फिल्मी आहे. त्यांची पहिली भेट 2004 मध्ये 'नंदागोकुला' या टीव्ही शोमध्ये झाली होती.
6/ 8
दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. विशेष म्हणजे अभिनेत्याने तिला फोनवर प्रपोज केलं होतं.
7/ 8
राधिकाने चक्क 6 महिन्यांनी यशला उत्तर दिलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये या जोडप्यानं गोव्यात लग्न केलं होतं.
8/ 8
यश आणि राधिकाला मुलगी आयरा आणि मुलगा यथर्व ही दोन मुले आहेत.