साऊथची लोकप्रिय अभिनेत्री कीर्ति सुरेश कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेळोवेळी कीर्तिने या बातम्यांचं खंडन केलं आहे. आता कीर्तिविषयी नव्या चर्चा रंगल्याचं समोर आलं आहे. आता पुन्हा एकदा या बातमीने जोर पकडला आहे की ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. इतकंच नाही तर लग्नानंतर ती फिल्म इंडस्ट्रीला अलविदा करणार आहे. इंडिया ग्लिट्झमधील ताज्या अहवालानुसार, कीर्ति लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि ती तिची अभिनय कारकीर्द आणि चित्रपट निर्मितीचे काम सोडून देईल. अभिनेत्रीचे आई-वडील मेनका आणि सुरेश यांनी आधीच तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात केली आहे आणि कीर्तीनेही लग्नासाठी होकार दिला असल्याची चर्चा रंगली आहे. कीर्तिने लग्नाविषयी अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नाहीये. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच 'दशहरा' या चित्रपटात दिसणार आहे.