OMG! एका एपिसोडसाठी 10 लाखांचा सूट, KBC मध्ये अमिताभ बच्चन यांची शानच न्यारी!
Kaun Banega Crorepati 12: या सीजनचा शेवटचा एपिसोड आज प्रसारित होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या शोचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. परंतु या शोची काही तथ्य अशी आहेत, ज्याबाबत कदाचितच माहिती असेल.
कौन बनेगा करोडपती 12 चा (Kaun Banega Crorepati 12) आजचा शेवटचा एपिसोड परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांसह होणार आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)
2/ 10
या शोबाबत एक प्रश्न सर्वांना पडलेला असतो की शोचे प्रश्न नेमकं कोण फ्रेम करतं? टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या खेळाच्या प्रत्येक स्तरावर स्पर्धकाच्या परफॉर्मेन्सप्रमाणे प्रश्नांची कठीण पातळी ठरवली जाते. हे काम प्रोडक्शन टीमद्वारा केलं जातं.
3/ 10
या स्पर्धेत पोहचण्यासाठी स्पर्धकाला तीन राउंड्स पार कराव्या लागतात.
4/ 10
यात आधी एसएमएस राउंड, फोन कॉल राउंड आणि fastest finger first राउंड्स असतात. (फोटो सौजन्य : Instagram/ @amitabhbachchan)
5/ 10
केबीसीच्या सेटवर असणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला निर्धारित नियमांचं पालन करावं लागतं. कोणताही स्पर्धक जो जिंकला किंवा हरला असेल, शूटिंग संपण्यापूर्वी त्याला सेट सोडून जाण्याची परवानगी नसते. (फोटो सौजन्य : Instagram/ @amitabhbachchan)
6/ 10
जर तुम्ही स्पर्धक बनून सेटवर जाऊन बिग बींची ऑटोग्राफ घेऊ शकता असं वाटतं असेल, तर हा समज चुकीचा आहे. रिपोर्ट्सनुसार, क्रू मेंबर्स सहजपणे अमिताभ बच्चन यांची ऑटोग्राफ घेण्याची परवानगी देत नाही. (फाइल फोटो)
7/ 10
स्पर्धक जी रक्कम जिंकतो, ती थेट बँकेत जमा होत नाही. जितकी रक्कम जिंकली आहे त्यातील 30 टक्के रक्कम कमी करून उरलेली रक्कम स्पर्धकाला दिली जाते. (फाइल फोटो)
8/ 10
उदा. जर एक कोटी रक्कम जिंकली, तर त्यातील 70 लाख रुपये स्पर्धकाला मिळतात. (फाइल फोटो)
9/ 10
बिग बीदेखील कोणताही स्पर्धक हॉटसीटवर बसण्यापूर्वी त्याच्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतात. (फाइल फोटो)
10/ 10
शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांचा खर्च 10 लाख रुपये असल्याची माहिती आहे. (फाइल फोटो)