बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने बिकिनी लुकमध्ये सर्वांनाच घायाळ केलं आहे. सध्या तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बिकिनीमध्ये दिसून येत आहे. यामध्ये ती अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे. कतरिना सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. कतरिना कैफ आपल्या आगामी जाहिरातीच्या शूटिंगसाठी मालदीवला गेली आहे. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये स्लाईस चा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यावरून कतरिना स्लाईसच्या जाहिरातीसाठी मालदीवला गेल्याच लक्षात येत आहे. कतरिना कैफने बिकीनी फोटो शेअर करताच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.