

मल्टीस्टारर सिनेमा भारतचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरमधून कतरिना कैफचा लुक आता समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये कटरिनाच्या वेगवेगळ्या झलक पाहायला मिळत आहेत. कतरिना या सिनेमात इंडियन लुकमध्ये दिसत असून यात कतरिना व्यतिरिक्त दिशा पटानी, नोरा फतेही आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


या ट्रेलरमधील कतरिनाच्या लूकची सध्या सगळीकडेच खूप चर्चा आहे. कुरळे केस, टिकली आणि साडीमधील कतरिनाचा लुक खूपच इंप्रेसिव्ह आहे. कुरळे केस तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत. 'भारत' मध्ये कतरिना सलमानची 'मॅडम सर' बनली आहे.


या ट्रेलरमध्ये कतरिनाला बराच स्पेस मिळाला आहे आणि प्रत्येक फ्रेममध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. सिनेमातील कतरिनाचे डायलॉगही मागच्या काही सिनेमांपेक्षा जास्त दमदार आहेत. याशिवाय या ट्रेलरमध्ये सलमान आणि कतरिनामधील प्रेमळ भांडण सुद्धा पाहायला मिळत आहे.


भारतमधील कतरिनानं साकारलेली ही भूमिका सुरुवातीला प्रियांका चोप्रा साकारणार होती. मात्र तिनं अचानक सिनेमातून माघार घेतल्यानं हा सिनेमा नंतर कतरिनाच्या पदरात पडला. आतापर्यंत कतरिना आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.


भारतमध्ये सलमानसोबत दिशा पटानी सुद्धा दिसणार आहे. या सिनेमातील दिशाचा लुक इतर सिनेमांच्या मानानं खूपच वेगळा आणि ग्लॅमरस आहे. लहान केस आणि स्टनिंग ड्रेस मध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे.


भारतमध्ये दिलबर गर्ल नोरा फतेही सुद्धा दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये नोराच्या आयटम साँगची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये ती बेली डान्स करताना दिसत आहे. 'सत्यमेव जयते'मधील दिलबर गाणं हिट झाल्यानंतर नोराला सलमानच्या सिनेमातील हे गाणं मिळालं आहे.


भारतमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ सलमानच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी 'रोमियो अकबर वॉल्टर' या सिनेमात जॅकी श्रॉफ यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या या भूमिकेचं कौतुकही झालं.


सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'भारत' ब्लॉकबास्टर ठरणार असल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा येत्या 5 जूनला ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.