विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम आला समोर आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये लग्नाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नसोहळ्याची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. वधू-वर आणि इतर पाहुणे बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. आज सकाळी विकीचा भाऊ अर्थातच सनी कौशल आणि त्याची गर्लफ्रेंड शर्वरी वाघ जयपूरमध्ये पोहोचले आहेत. तसेच ज्यांच्या घरी विकी आणि कतरिनाचा रोका झाल्याचं म्हटलं जात होतं ते डायरेक्टर कबीर खान आपल्या कुटुंबासह पोहोचले आहेत. तसेच बॉलिवूडचा प्रसिद्ध डायरेक्टर आणि कतरिनाचा खास मित्र करण जोहरसुद्धा पोहोचला आहे. अभिनेता सुनील शेट्टीसुद्धा आज जयपूरमध्ये पोहोचले आहेत. अभिनेत्री नेहा धुपिया आपल्या पती व मुलांसह येथे पोहोचली आहे. तसेच अभिनेत्री मिनी माथूरसुद्धा लग्नासाठी पोहोचली आहे. प्रसिद्ध गायक गुरुदास मानसुद्धा जयपूरला पोहोचला आहे. तसेच सिमरन कौरसुद्धा याठिकाणी रवाना झाली आहे.