कतरिना आणि विकी कौशल 9 डिसेंबरला लग्न करणार आहेत. पण 11 वर्षांपूर्वी सलमानसोबत तुटलेले नाते आजही त्या भूतकाळाशी जोडले जात आहे. कतरिनाला आजही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हटले जाते. विशेष म्हणजे सलमानच्या सर्व एक्स गर्लफ्रेंड आजही यांना देखील असंच म्हटलं जाते. आज या सलमानच्या एक्स काय करतात हेच जाणून घेणार आहे.
सलमान आणि संगीता यांचे नाते जवळपास 10 वर्षे टिकले. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यानंतर सलमानच्या आयुष्यात सोमी अलीची एंट्री झाली. संगीता आणि सलमानचे ब्रेकअप झाले. यानंतर संगीताने 14 नोव्हेंबर 1996 रोजी क्रिकेट मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. पण 2010 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. संगीता आता बिझनेस वुमन आहे. तिची सलमानसोबतची मैत्री कायम आहे.
ऐश्वर्यानंतर सलमानच्या आयुष्यात कतरिना कैफ आली. कतरिना आणि सलमानच्या वयात 18 वर्षांचे अंतर आहे. 2003 मध्ये कतरिनाने 'बूम' चित्रपटातून डेब्यू केला होता. मात्र, ती 2005 मध्ये प्रकाशझोतात आली, जेव्हा तिचा सलमानसोबतचा 'मैने प्यार क्यूं किया' आणि प्रकाश झा यांचा 'सरकार' रिलीज झाला. सलमान आणि कतरिनाचे कधीही जाहीरपणे नात्याची कबुली दिली नाही.
जवळपास 7 वर्षे हे नाते प्रेम आणि आदर यांचे कॉकटेलसारखे होते. 2010 मध्ये कतरिनाच्या आयुष्यात रणबीर कपूर आला . यानंतर कतरिना सलमानबद्दल म्हणाली होती, 'ते माझे पहिले गंभीर रिलेशनशिप होते. आम्ही आजही चांगले मित्र आहोत. त्याने मला मार्गदर्शन केले आणि मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिकवले. 2016 मध्ये कतरिनाचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअपही झाले. रणबीरच्या आयुष्यात कतरिनाची बेस्ट फ्रेंड आलिया भट्ट आली. कतरिना पुन्हा एकदा सलमानच्या जवळ आली, पण यावेळी मैत्री आणि आदराचे बंध जोडले गेले, जे आजही कायम आहेत.आता कतरिना विकीसोबत नव्या आयुष्याला सुरूवात करत आहे.