कश्मीरा शाह (Kashmera Shah) हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वश्रृत नाव आहे. कश्मीरा बिग बॉस या शोमध्येही झळकली होती. पण या शोमधून तिला लवकरच बाहेर पडावं लागलं होतं. सध्या ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिचा नवरा आणि प्रसिद्ध अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek)ने स्वत: कश्मीराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
कश्मीरा शाह आणि कृष्णाने 2013 मध्ये लग्न केलं. कश्मीराचं हे दुसरं लग्न आहे. लग्नानंतर कश्मीराने आई होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी तिला काही ना काही कॉम्पिकेशन्स येत होत्या. कश्मीराने 1- 2 वेळा नाही तर तब्बल 14 वेळा आई होण्यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यांना यश येत नव्हतं. शेवटी त्या दोघांनी सलमान खानने दिलेला सल्ला ऐकला आणि आता त्यांना 2 गोजिरवाणी मुलं आहेत.
कश्मीरा शाह आणि कृष्णा यांच्या प्रेमाची सुरुवात पप्पू पास हो गया या चित्रपटाच्या सेटवर झाली. शूटिंग संपल्यानंतरही ते दोघं एकमेकांसोबत वेळ घातलवत. काही दिवसांनी त्यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं पण त्यांचं नातं जगजाहीर केलं नव्हतं. पण काही वर्षांनी त्यांनी स्वत: त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितलं.